पेडणे तालुका दौऱयावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची ग्वाही : मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटलमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणार
प्रतिनिधी /पेडणे
कासरवर्णे येथील उपआरोग्य केंद्राच्या जागी नवीन सामुदायिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. तुये सामुदायिक आरोग्य केंद्र व कासरवर्णे उपआरोग्य केंद्राला प्राधान्यक्रमाने सत्तरीच्या धर्तीवर पेडणे तालुक्मयासाठी सेटलाईट हॉस्पिटल लवकरच तयार करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पेडणे तालुक्मयाच्या दौऱया दरम्यान दिली.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पेडणे मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी मालपे येथे कार्यालयात आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच महिलानी ओवाळून स्वागत केले. त्यानंतर कासरवर्णे येथील उपआरोग्य केंद्राला भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण आर्लेकर, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, तोरसे जिल्हा पंचायतसदस्य सीमा खडपे, कासरवर्णे आरोग्य अधिकारी डॉ. नार्वेकर, तुये आरोग्य अधिकारी डॉ. विद्या परब, 108 रुग्ण सेवा प्रमुख सुषमा सेनी, कासरवर्णे सरपंच सुवर्णा केणी, माजी सरपंच संतोष मळीक, आरोग्य अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कासरवर्णे येथील भेडसावणाऱया समस्या नागरिक व आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासमोर मांडल्या. पेडणे मतदारसंघातील सरपंच, पंच तसेच पालिका मंडळाची आरोग्यमंत्र्याने बैठक घेतली. यावेळी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, मांदेचे माजी आमदार दयानंद सोपटे, पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, खाजने- अमेरे- पोरस्कडे पंचायत सरपंचा निशा हळदणकर, तांबोसे – मोप – उगवे पंचायतीचे सरपंच सुबोध महाले, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, पेडणे पालिका नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, कोरगाव सरपंच समील भाटलेकर, वारखंड -नागझर सरपंच गौरी जोसलकर, इब्रामपूर – हणखणे सरापंच अशोक धावस्कर, वजरी सरपंच अनिल शेटय़े, माजी सरपंच संगीता गावकर, विर्नोडा सरपंच सुजाता ठाकूर, उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेविका आश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर, राखी कशालकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, शिवराम तुकोजी, मनोज हरमलकर, मोरजी सरपंच सुरेखा शेटगावकर, उपसरपंच पवन मोरजे, पंच विलास मोरजे, मुकेश गडेकर, उपसरपंच कल्पीता कलशांवकर, पंच तृप्ती नर्से, दिवाकर जाधव, अब्दुल नाईक, देविदास नागवेकर, वारखंड नागझर उपसरपंच वसंत नाईक, धारगळचे पंच भूषण नाईक व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विश्वजीत राणे यांनी सुरुवातीला कासरवर्णे येथील सामुदायिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. ही इमारत पूर्ण जीर्ण झाल्याने नवीन इमारत बांधण्यासाठीची प्राथमिक चर्चा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करून लवकरात लवकर सर्व सोयी सुविधायुक्त इमारत उपलब्ध केली जाईल. तुये नवीन हॉस्पिटलसाठी इमारत उभारले परंतु डॉक्टर व इतर सोयी सुविधा दिल्या नाहीत, त्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच तालुक्यातील आरोग्याची समस्या सोडवण्याचा आपला प्रयत्न असेल, त्यासाठी तालुक्मयात सेटलाईट हॉस्पिटल उभारण्याची ग्वाही यावेळी मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
सत्तरीच्या धर्तीवरच पेडणेतील युवकांना नोकऱया
बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलताना मंत्री राणे यांनी, ज्या पद्धतीने सत्तरी तालुक्मयातील नागरिकांना, युवकांना सरकारी नोकऱया उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच पद्धतीच्या नोकऱया पेडणे तालुक्मयातील बेरोजगार युवकांना देण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असे आश्वासन दिले. पेडणे मतदारासंघात मोपा विमानतळ, आयुष्य हॉस्पिटल होत आहे. या दोन्ही प्रकल्पामधून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपणही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कामचुकार कर्मचाऱयांवर कारवाई होणार
हॉस्पिटलमधील काही कर्मचारी जे वाळपई, सत्तरी भागातील आहे ते लवकर घरी जातात. असा दावा यावेळी पत्रकारांनी केला असता, आपण यात लक्ष घालणार असून हॉस्पिटलचे अधिकाऱयांनाही सूचना करणार आहे. कामचुकार किंवा लवकर घरी जाणाऱयांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, वनखात्यांतर्गत ज्या काही अडचणी स्थानिकांना घर बांधण्यासाठी किंवा रस्ता करण्यासाठी असतील त्या सोडविण्याची ग्वाही दिली. शिवाय नगर नियोजन खात्यांतर्गत काही अडचणी असतील तर त्याही सोडवण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्याचे सांगितले .
पेडणे मतदारसंघाला 108 रुग्णसेवा वाहन
यावेळी मंत्री राणे यांनी पेडणे मतदारसंघासाठी खास 108 रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले. त्याच पद्धतीने मांदे मतदारसंघातही खास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणार आहे. मांदे मतदारसंघाचाही आपण आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालवाडी, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, त्यांना चांगल्या सुविधा, क्रीडा मैदाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी, आपण केलेल्या सूचनेनुसार मंत्री विश्वजीत राणे यांनी कासारवर्णे आरोग्य केंद्राला भेट देऊन तिथली समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच मंत्र्यांनी तिथे सोयी सुविधा उपलब्ध करणार असल्याचेही सांगितले.