उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर ,पेडणे येथे पहिले कोरोना सेंटर कार्यरत
पेडणे ( प्रतिनिधी )
पेडणे तालुक्मयात सावळवाडा इनडोअर स्टेडीयम येथे पहिले कोरोना सेटर कार्यरत केले . त्यात सर्वसाधारण 50 खाटा व वीस खाटासाठी आ?क्सजिनची सोय , शिवाय दोन रुग्ण वाहिका तैनात असणार आहे . ज्याना कुणाला कोरोनाची बाधा झाली असेल त्यांनी या सेंटरमध्ये यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी कोरोना सेंटरची 7 रोजी पाहणी करून ते कार्यरत केल्यानंतर पत्रकारांकडे बोलत होते .
यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रा?य , पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर , चांदेल सरपंच संतोष मळीक , माजी सरपंच प्रदीप कांबळी, आनंद सावळ देसाई, प्रकाश कांबळी , ज्ञानेश्वर परब , आदी उपस्थित होते .
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना या सेंटरचा ताबा पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्याकडे असणार आहे . या सेंटर मध्ये ज्या सोयी सुविधा आहेत त्याचा लाभ जे कोणी सकारात्मक आहेत त्यांनी घ्यावा , जास्त तब्बेत बिघडली तर त्याना जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी यावेळी सांगितले .
अखेर मुहूर्त सापडलाच
आज होणार उद्या होणार म्हणून पेडणेवासीय या सेंटरकडे मागच्या वर्षापासून हे सेंटर सुरू होणार याची वाट पाहत होते . अखेर 7 मे रोजी या कोरोना सेंटरला मुहूर्त सापडला आहे . कोरोना सेंटर कार्यरत झाल्यामुळे तालुक्मयातील नागरिकाना तालुक्मयातच उपचार करून घेण्याची सोय होणार आहे.
या ठिकाणी कोरोना सेंटर सुरु व्हावे यासाठी मागच्या वर्षापासून विविध पक्षाच्या नेत्यांनी, नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यानी , पेडणे उपजिल्हाधिकारी , सरकार याना लेखी निवेदन देवून मागणी करत होते. मात्र सरकार चालढकल करत असल्याने मुहूर्त लांबणीवर पडला होता . कोरोना सेंटर चालू करावे यासाठी मांदेचे आमदार दयानंद सोपटे व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी जोरदार प्रयत्न केले होते .
मगो पक्षाचे पेडणेचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी सावळवाडा येथील कोरोना केअर सेंटर तातडीने सुरु करावे अशी जोरदार मागणी दोन दिवासापूर्वी केली होती.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विठू मोरजकर , पेडणे नागरिक समितीचे अध्यक्ष भरत बागकर ,मगो पक्ष पेडणे प्रवक्ते उमेश तळवणेकर आदीनी हे कोरोना सेंटर सरकारने सुरू करावे अशी अनेक वेळा मागणी केली होती.