पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे तालुक्मयातील पत्रादेवी बांदा सीमेवर असलेल्या चेकनाक्मयावरून परराज्यातून येणाऱया नागरिकाना कोरोना लागण होत असल्याने ग्रीन झोन असलेला गोवा आता डेंजर झोन मध्ये येत असल्याने तालुक्मयात जास्त करून सीमेलगत असलेल्या गावामध्ये खळबळ माजली आहे , चेकनाक्मयावर येणाऱया वाहनांची व्यवस्थित तपासणी केली जात नसल्याचे आता हळू हळू उघड झाले आहे . काही वाहने तर पोलीस न तपासताच राज्यात प्रवेश देतात , हजारो येणाऱया वाहनांची सविस्तर माहिती योग्य ती तपासणी करण्यासाठी नाक्मयावर कर्मचाऱयांचा अभाव आहे आणि पत्रादेवी चेक नाक्मयावर नकोरे बाबा डीवटी अशी विनवणी कर्मचारी आपल्या वरि÷ांकडे करताना दिसत आहे .
12 रोजी मुंबई येथून एका बा?लेरोतून आलेला सहाही नागरिकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने आता या नाक्मयावर काम करण्यासाठी कर्मचारी वर्ग घाबरत असतात .12 रोजी जे कर्मचारी कामावर तिथे होते त्याना सेल्फ होम क्मयोरंटाइन व्हावे लागले होते , एकूण 15 कर्मचाऱयांनी कोरोना चाचणी दिली त्यांचा अहवाल सकारात्मक आला तरीही कर्मचाऱयामध्ये भीतीचे सावट पसरलेले आहे . या नाक्मयावर कोणत्याच प्रकारच्या पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी याना सुविधा नाहि , केवळ प्रेशर तपासणी करून राज्यात प्रवेश दिला जातो .
ड़ पत्रादेवी चेक नका आता डेंजर झोन असुरक्षित बनत चालला आहे . बाहेर राज्यातून येणाऱया सर्वच वाहनांची योग्य पद्धतीने तपासणी केली जात नाही अशी खात्रीलायक माहिती उपलब्ध होत नाही .
ड़ केवळ टेम्प्रेचर तपासणी
पत्रादेवी चेक नाक्मयावर दिवसाचे 24 तासही कडक पोलीस बंदोबस्त आहे शिवाय खास नियुक्त केलेले मामलेदार तैनात असतात . बाहेरून येणाऱया मालवाहू वाहनामध्ये एक चालक व एक क्लीनर दोघांनाच प्रवेश दिला जातो , ते कुठून आले जाणार कुठे ,त्याच्या वैदकीय अहवाल आहे कि नाही व त्यांचा टेम्प्रेचर आरोग्य कर्मचारी तपासतात .12 रोजी मुंबई येथून आलेल्या सहाही नागरीकांचा टेम्प्रेचर नॉर्मल होता अशी माहिती उपलब्ध झाली मग राज्यात प्रवेश केल्यावरच त्याचा टेम्प्रेचर वाढून कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने वातावरण नाक्मयावरच भयभीत झाले आहे .
ड़ नईबाग ा सातार्डा चेकनाक्मयावर देवाण- घेवाण
पेडणे तालुक्मयात पत्रादेवी ा बांदा , किरणपाणी ा आरोंदा व नईबाग – सातार्डा हे महत्वाचे तीन पोलीस चेक नाके आहेत ,त्यापैकी केवळ सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्ग 64 वरील पत्रादेवी ा बांदा हा चेकनाका कडक पोलीस बंदोबस्तात खुला आहे तर न्हायबाग- सातार्डा आणि किरणपाणी शिवाय अंतर्गत रस्त्यावरील पत्रादेवी बांदा हे चेकनाके पूर्णपणे बंद आहेत त्याठिकाणी दोन्ही बाजूने राज्याचे व महाराष्ट्र पोलीस बंदोबस्त आहे . या नाक्मयावरून कुणालाही प्रवेश दिला जात नाही ,मात्र घरगुती जीवनावश्यक वस्तूंची देवाण घेवाण चालू आहे . नईबाग पुलावर सातार्डा , कवठणी भागातील मिरच्या , नारळ , आंबे , फणस , झाडू या वस्तू या पुलावर आणून देतात व येथून ते पुलावरून घेवून जातात , मात्र कुणा व्यक्तीला सातार्डा पूल क्रास करायला मिळत नाही .महाराष्ट्र येथील व्यापारी या पुलावर सामान आणून देतात , त्याच पद्धतीने बांदा भागातील व्यापारी पत्रादेवी खालच्या गेटवर नागरिकाना आवश्यक ते समान आणून देवाण घेवाण करतात ,त्यामुळे सीमाभागातील नागरिकांची सोय होते .
ड़ पत्रादेवी येथून चोरवाटेतून मोठय़ा प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे , आणि या व्यवहारात अनेकजण गुंतले आहेत.
ड़ रेल्वे पुलातून प्रवेश
तेरेखोल नदीवर उगवे सातोसे असा रेल्वे पूल आहे , या रेल्वे पुलावरून पहाटे सातार्डा , सातोसे , कवठणी या भागातून कामगार व्यापारी राज्यात प्रवेश करतात , या पुलावर कोणत्याच प्रकारची तपासणी केली जात नाही किंवा पोलीस बंदोबस नाही .
ड़ होडीतूनहीन प्रवेश
सातोसे ते उगवे , कासात- ते तोरसे , आणि कवठणी ते देवसू या जलमार्गातून होद्यातून महाराष्ट्र येथून नागरिक प्रवेश करत असल्याने खळबळ माजलेली आहे .
केरी तेरेखोल भागातही प्रवेश
केरी तेरेखोल भागात तेरेखोल नदीवर फेरीसेवा चालू आहे , रेडी शिरोडा भागातील काही व्यापारी , नागरिक चोर वाटातून फेरीबोटीत येतात आपले समान विक्री व जाताना दारू घेवून जातात , तेरेखोल बारमध्ये अनेक महाराष्ट्र येथील नागरिक दारू पिण्यासाठी येतात तेरेखोल व रेडी सीमा जवळच असल्याने चोर वाटातून तेथील नागरिक दारूसाठी तेरेखोल गावात प्रवेश करतात , सिंधुदुर्ग भागात कोरोना रुग्ण सापडत असल्याने आणि सिमेभागातील चोर वाटातून येत असल्येल्या नागरीकामुळे चितेचे वातावरण पसरले आहे