पेडणे / प्रतिनिधी
पेडणे तालुक्मयात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. ठिकठीकाणी घरावर रस्त्यावर झाडे पडल्याने लाखो रुपये नुकसानी झाल्याच्या घटना घडल्या . पेडणे अग्निशमन दलाचे जवान दिवस रात्र अडथळे दूर करण्यासाठी कार्यरत होते.
शुक्रवारी 12 रोजी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे ओशालबाग धारगळ येथे राजेश्री धर्मा पटेकर यांच्या घरावर वडाचे झाड पडून सुमारे साठ हजाराचे नुकसान झाले .तर एका लाखां पेक्षा जास्त नुकसानी वाचवण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले .
गाडवाडा केरी येथे वीज वाहिन्यावर नारळाचे झाड पडून घराचेही नुकसान झाले . तर नईबाग पेडणे येथे रस्त्यावर काजूचे झाड पडून काही तास वाहतूक सेवा विस्कळीत झाली .
ठिकठीकाणी पडलेल्या झाडांचे अडथळे , पेडणे अग्निशामन दलाचे अधिकारी दिलीप गावस सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयराम मळीक , जयराम शेटगावकर , प्रशांत सावळ देसाई , प्रमोद गवंडी , डॉमनिक मार्टिन , श्याम आरोंदेकर , राजेश परब , मयूर नाईक , विठ्ठल परब , शैलेश हळदणकर अमोल परब , अमित सावळ , शेखर मयेकर , आशीर्वाद गाड , मनोज साळगावकर आदी जवानांनी बरेच परिश्रम घेऊन झाडे कापून बाजूला केली .
विजेचा लपंडाव
तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात विजेचा लपंडाव सुरु झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत .वारा असो किंवा पाऊस असो किंवा नसो विजेचा लपंडाव हा नित्याचाच ठरलेला आहे . त्यामुळे शुक्रवारी आणि त्यात पावसाची भर पडल्याने अनेक भागात वीज पुरवठा खंडित राहिला.
रस्त्यावरून पाणी , दगड , कचरा आला रस्त्यावर
गुरुवारी पासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी जोर लावला. धो धो पडत असलेल्या पावसाचे अनेक ठिकाणी पाणी साचले. पेडणे तालुक्मयातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. गटार भरुन पाणी रस्त्यावर आले. त्याच बरोबर माती , दगड कचरा पाला पाचोळाही रस्त्यावर आला. काही ठिकाणी गटार व्यवस्था नसल्याने पावसाचे थेट पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र दिसत होते .