पेडणे (प्रतिनिधी ):
पेडणे तालुक्मयात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी विविध भागात झाडे पडून लाखो रुपयाचे नुकसान झाले.
मोपा येथे विनायक परब यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे 15 हजार रुपयाचे नुकसान झाले. भाईडवाडा कोरगाव येथे श्रीराम बली यांच्या घरावर माड पडून सुमारे 15 हजार रुपयाचे नुकसान झाले.
खर्पेवाडा मांदे येथे गुलमोहराचे झाड पडून संचिता खर्पे यांच्या व्ह?गानर गाडीचे सुमारे 75 हजार रुपयाचे नुकसान झाले.
धागरळ येथे रस्त्यावर आंब्याचे झाड पडले.
कोनाडी कोरगाव येथे आरोलकर यांच्या घराशेजारी असलेल्या फणसाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
पेडणे अग्निशमन दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, विठ्ठल परब, सहदेव चोडणकर , विशाल पाटील, दिलीप बाबरेकर, श्याम आरोंदेकर , प्रदिप आसोलकर आदीनी ही झाडे कापून बाजूला केली.