पेडणे ( प्रतिनिधी )
पेडणे तालुक्मयात कोरोना आटोक्मयात येत नसल्याने नागरिकांना आता चिंता सतावू लागली आहे. पेडणे तालुक्मयात आता हळू हळू कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे . मांदे पंचायत क्षेत्रात सलग तीन दिवस कोरोनाची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे .पेडणे तालुक्मयात बुधवारी दिवसभरात 40 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत . मांदे गावात नवीन 15 कोरोना मिळाल्याने या गावाने शतक पार केले तर पूर्ण तालुक्मयात आतापर्यंत सहाशेचा पल्ला गाठला .
पेडणे तालुक्मयात आतापर्यंत 604 कोरोना बाधितांचा आकडा झाला असून 401 कोरोना बाधित ठीक झाले तर 202 सक्रीय आहेत , आता पर्यंत 5 जणांचे बळी गेले आहेत .
ड़ बुधवारी दिवसभरात मांदे 15 , वझरी 1 , धारगळ 8 , वारखंड 2 , नागझर 3 , कोरगाव 2 , पेडणे पालिका क्षेत्रात 1 , तुये 1 , हरमल 3 आगरवाडा 1 , उगवे 1 , मोरजी 1 व पार्से 1 मिळून 40 कोरोना बाधितांचा आकडा झाला . त्यात आतापर्यंतसर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा मांदे पंचायत क्षेत्रात 110 आकडा झाला तर दुसऱया क्रमांकावर पेडणे पालिका क्षेत्रात 60 वर आकडा पोचला आहे . हरमल 55 , केरी 11 , मोरजी 18 , कासार्वारणे 13 , नईबाग 6 , पार्से 28 , वजरी 20 , वारखंड 17 , पालये 13 , विर्नोडा 23 , कोरगाव 47 , हसापुर 8, धारगळ 46 , तुये 36 , तांबोसे 8 , तळर्ण 5 , चोपडे 6 , मालपे 4 खाजणे 1 , नागझर 15 , तोरसे 10, मोपा 9 , इब्रामपूर 1 ,उगवे 23 व आगरवाडा 13 मिळून 604 झाला आहे .पेडणे तालुक्मयात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी कोरोनापासून ठीक होणाऱयांची संख्या लक्षणीय होत आहे .
ड़ पेडणे तालुक्मयात होऊ घातलेल्या कोरोना केअर सेंटर तातडीने सुरू करावेः सीताराम परब व सुशांत मांदेकर
पेडणे तालुक्मयात कोरोना केअर सेंटरसाठी विलंब होत असल्याने नागरिक सीताराम परब वा सुशांत मांदेकर यांनी नाराजी व्यक्त करून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे . एका बाजूने कोरोनाचा आकडा वाढतो तर दुसऱया बाजूने तालुक्मयातील रुग्णांना दूर ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. पेडणे तालुक्मयात वाढती रुग्णसंख्या हे चिंतेचे कारण असून जे तालुक्मयातील रुग्ण पा?झिटिव्ह मिळतात त्यांना आपल्याच तालुक्मयाच्या ठिकाणी उपचार घेता येण्यासाठी सरकारने हे कोरोना केअर सेंटर सुरु कृरण्याचे ठरविले आहे. माञ गेले दोन महिने केंद्र सुरू होणार अशीच माहिती मिळते. माझ प्रत्यक्षात अजूनपर्यंत हे केंद्र सुरु झाले नाही . कोरोना केअर सेंटरचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे ते मुद्दामहून चालढकल करत वेळ घालवत असेल तर त्यांची चौकशी करावी अशी मागणी सुशांत मांदेकर यांनी केली आहे.
सध्या तालुक्मयातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . त्यामुळे पेडणे अग्निशमन दलाचेही काम वाढवले आहे. प्रत्येक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी या जवानाना जावे लागत आहेत.त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उभा राहत आहे.