ठिकठिकाणी झाडे, वीजखांबाची पडझड
पेडणे / प्रतिनिधी
पेडणे तालुक्मयात सोमवारी राञी आणि मंगळवारी पडलेल्या मुसाळधार पाऊस व जोरदार वारा यामुळे अनेक ठिकाणी झाडे मोडून घरांवर तसेच वीज वाहिन्यावर पडल्याने वीज खांब मोडले तसेच घरावर झाडे पडल्याने घरांची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली.
सोमवारी रात्री सोणये पालये येथे आंब्याचे झाड पडल्याने वीज वाहीन्या व खांबा मोडुन रस्त्यावर पडलेल्याने वीजा पुरवठा खंडित झाला. लोकांना वीजेपासुन रहाव लागले . मध्य रात्री चावदेवाडा पार्से येथे आंब्याचे झाड धालाचोमांड यांच्यावर पडलेल्यांने 10 हजार रुपयांचे नुकसान झाले.रात्री दोन वाजता कोंडलवाडा येथे कृष्णा देसाई यांच्या घरावर माड पडून 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. मंगृळवारी पहाटे 4 वाजता हळर्ण येथे भर रस्त्यात फणसाचे झाड पडल्याने रस्ता बंद झाला. सोमवारी राञी 11.30 वाजता माईण कोरगाव येथे सावरीचे झाड पडल्याने वीज वाहिन्या आणि वीज खांब मधोमध रस्त्यावर पडलेल्याने लोकांना वीजेपासून रहाव लागले.
मंगळवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान पेडणे येथे मोठे माडतीचे झाड पडल्याने वहातुकीस रस्ता बंद झाला. सकाळी पावणे सात वाजता मडकई वजरी येथे हनुमंत परब यांच्या घरावर मोठे भेंडीचे झाड पडल्याने 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर अग्नी शामक दलाच्या जवानांनी 1,00,000 लाखाहुन मालमत्ता वाचवण्यात यश आले. सकाळी चांदेल येथे केशव गावस यांच्या घरावर झाड पडल्याने 50 हजार रुपयांचे नुकसान झाले तर अग्नीशामक दलाच्या जवानांनी 75 हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. सकाळी वारपे पेडणे येथे नामदेव पडवाल यांच्या घरावर झाड पडल्याने 10 हजार रुपयांचे नुकसान झाले .तर अग्नीशामक दलाच्या जवानांनी 1 लाखा पेक्षा जास्त मालमत्ता वाचवण्यात यश आले.सकाळी चावदेवाडा पार्से येथे घरावर झाड पडल्याने 10 हजार रुपयांचे नुकसान झाले तर अग्नीशामक दलाच्या जवानांनी 50 हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. पवन वाडा केरी येथे ज्यूस स्टाॕलवर भले मोठे आंब्याचे झाड पडल्याने 7000 हजार रुपयांचे नुकसान झाले तर अग्नीशामक दलाच्या जवानांनी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता वाचवण्यात यश आले.
पेडणे अग्निशमन दलाची उडाली तारंबळ, सोमवारी सायंकाळी ते मंगळवारी सायंकाळी पर्यंत 25 काॕल्स
सोमवारी राञी तसेच मंगळवारी संपूर्ण दिवस तालुक्मयाच्या विविध भागात पडलेल्या झाडामुळे पेडणे अग्निशमन दलाची झाडे कापून बाजूला करताना बरीच दमछाक झाली. एका मागून एक असे झाडा पडल्याचे काॕल पेडणे अग्निशमन दालाच्या कार्यालयाला आल्याने राञ दिवस काम करुन हे जवान थकले .
पेडणे अग्नी शामक दलाचे अधिकारी दिलीप गावस यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर सहाय्यक अधिकारी जयराम मळीक , हवालदार जयराम शेटगावकर हवालदार फटू नाईक , चालक दीलीप बाबरेकर चालक विठ्ठल परब, चालक रामदास परब , जवान डाॕम्नकि मार्टीन , विशाल पाटील , लक्षदीप हरमलकर, अमोल परब, अविनाश नाईक, सहदेव चोडणकर , यशवंत नाईक , शेखर मयेकर, प्रज्योत होबळे, प्रशांत सावळ देसाई , विकास चव्हीहाण रतन परब, संदेश पेडणेकर झाडे कापून बाजूला करत आडथळा दूर केला.