पेडणे / प्रतिनिधी
पेडणे तालुक्मयात मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवान विस्कळीत झाले. तालुक्मयात अनेक ठिकाणी रस्तावर पाणी साचले.
काल पासून सक्रिय झालेल्या पावसाने आज दुसऱया दिवशी पेडणे तालुक्मयात जोरदारपणे हजेरी लावली. मंगळवारी सकाळी कमी तर संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. दुपारी पडलेल्या जोरदार पावसामुळे पेडणे तालुक्मयातील काही भागात पाणी साचले. शहरातील काही भागात गटारे तुंबून रस्त्यावर पाणी आले. पेडणे दुकाने जरी उघडी असलीतरी बाजारात संध्याकाळी शुकशुकाट होता.
ड़ यंदा पालिका क्षेत्रातील गटारे अगोदरच उपसल्याने पालिका क्षेत्रात पाणी साचले नाही.माञ तालुक्मयातील विविध गावात रस्त्यावर पाणी साचले तसेच पावसामुळे माती दगड वाहून रस्त्यावर आली.
पाऊसामुळे नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळले. मुसळधारा मुळे सर्वञ 5 नंतरच संध्याकाळी काळोख पसरला. सरकारी कर्मचारी तसेच खाजगी आस्थापनात जाणारे कर्मचारी वगळता इतर नागरिकांनी घरात राहणे पसंत केले.