प्रतिनिधी/ पेडणे
पेडणे येथील शिमगोत्सवाला सतियादेवी नईबाग येथील अन्नपूर्ण येथे हळदोण्याने 27 रोजी सुरुवात झाली . पेडणे येथील प्रसिध्द शमगोत्सव हा बारा गावचा आहे. रविवारी होळी घालून या शिमगोत्सवाला सात दिवसांच्या पेडणेच्या शिमगोत्सवाला ख-या अर्थाने सुरुवात झाली. रविवारी पौर्णिमेला सर्वञ पेडणे तालुक्मयाच्या विविध गावातील वाडय़ा वाडय़ावर होळी राञी घालण्यात आली.
पेडणेच्या बारा गावची बारा रोमटे ही सातव्या दिवशी व रोमटामेळ हे सतियादेवी नईबाग येथे गुलाल उधळून सांगता होणार आहे.
पेडणे तालुक्मयातील पारंपरिक उत्सव म्हणून शिमगोत्सव वीसही पंचायत क्षेत्रात आणि पालिका क्षेत्रात आज शिमगोत्सवाला सुरुवात झाली. पेडणे पेडणे तालुक्मयात काही गावात सात दिवसांचा शिमगोत्सव आहे तर ठिकाणी नऊ दिवसांचा आहे.