सार्वजनिक रस्ता विभागाचे दुर्लक्ष : ऍड जितेंद्र गावकर
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे बाजारपेठ जळवच्या पाटो रस्त्याला भलामोठा मधोमध खड्डा पडला असून या रस्त्याबाबत सार्वजनिक रस्ते विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. संबंधित विभागाने सदर रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पेडणे मतदारसंघाचे गोवा फॉरवर्डचे नेते ऍड. जितेंद्र गावकर यांनी केली आहे.
पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे कार्यालय 100 मीटरवर असूनही पाटो रस्त्याला पडलेला भला मोठा खड्डा अधिकाऱयांना दिसत नाही. त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. गुरुवार हा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा दिवस त्याच दिवशी पोलीस ट्राफिक उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या जनता दरबाराची वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी मग्न होती. मात्र या ठिकाणी भलामोठा पडलेला खड्डा आणि वाहतुकीची होणारी कोंडी याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. त्याबद्दल वकील जितेंद्र गावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.