प्रतिनिधी / पेडणे
पेडणे पोलिसांनी अमली प्रदार्थ बाळगल्या प्रकरणी चेन्नई येथील नागरिकाने अमली प्रदार्थ बाळगल्या प्रकरणी त्याला ताब्यात घेऊन दीड लाख रुपये किंमतीचे अमली प्रदार्थ जप्त केले.
पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार 18 आ?क्टोबर रोजी त्यांना खास सूञा?कडून माहित मिळाली कि खालचावाडा हरमल पेडणे येथे कॉक टाउन रिसॉर्टमध्ये अमली प्रदार्थाचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्वतः पोलीस निरीक्षक दळवी यांच्यासह उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, का?न्स्ट?बल दयेश खांडेपारकर, विनोद पेडणेकर आणि अर्जुन कळंगुटकर यांचा समावेश असलेली टीम तयार करुन तातडीने त्याठिकाणी पाळत ठेवली. त्या दरम्यान संशयीत आरोपी अमली पदार्थासह त्या ठिकाणी आला असता पोलिसांनी छापा टाकला असता तिथे दिड किलो वजनाचा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत असले मारिजुआना हे आमली प्रदार्थ म्हणजे ओळखले जाणारे मादक द्रव्ये जप्त करण्यात आले.या प्रकरणी शिवकुमारन वेदचलम सुंदरमूर्ती, वय 43 वर्ष, मैलापूर चेन्नई येथील मुळ रहिवाशी याला ताब्यात घेत त्याच्यावर पेडणे पोलिसांनी अमली प्रदार्थ गुन्हा कलम खाली गुन्हा दाखल केला आहे. अधिनियम, 1985 वर उल्लेख केलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक जिवबा दळवी, उपआधिक्षक गजानंद प्रभुदेसाई आणि उत्तर गोवा अधिक्षक शोबित सक्सेना यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.