पेडणे (प्रतिनिधी ) पेडणे बसस्थानकात अखेर वाहतूक खात्याचे कार्यालय सुरू करण्याचे वाहतूक खात्याने निर्णय घेतल्याने आज वाहतूक खात्याचे कार्यालय स्थलांतर करुन त्याचे उद्घाटन होणार आहे.
पेडणे कंदबा बससास्थानकाचे 20 डिसेंबर2016 रोजी तत्कालीन माजी केंद्रीय संरक्षण मंञी मनोहर पर्रीकर , तत्कालीन मुख्यमंञी लक्ष्मीकांत पार्सेकर, तत्कालीन सभापती राजेंद्र आर्लेकर आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर गेली चार वर्षे तांञिक अडचणीमुळे हे बसस्थानक पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी सरकार व संबंधित खात्याला अपयश आले होते. गेली आठ वर्षे पेडणे वाहतूक खात्याचे कार्यालय हे मालपे येथे एका भाडेपट्टीवर घेण्यात आलेल्या जागेत सुरू होते.
पेडणे बसस्थानकावर आरटीओ कार्यालय सुरू करावे अशी मागणी पेडणे तालुक्मयातील नागरिकांनी सातत्याने केली होती. या संबंधीच्या वर्तमानपञातून अनेक वेळा आवाज उठविण्यात आला.
पेडणे मतदारासंघाचे आमदार तथा उपमुख्यमंञी मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी यांची गंभीर दखल घेत आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत मुख्यमंञी तसेच वाहतूक मंञी माविन गुदिन्हो यांच्याशी चर्चा करुन पेडणे बसस्थानकाबाबत किचकट असलेल्या सरकारी कार्यालयीन प्रक्रिया दूर करतया बसस्थानकावर वाहतूक खात्याचे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
ड़ आज शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता पेडणे बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावर या कार्यालयाचे उद्घाटन वाहतूक मंञी माविन गुदिन्हो यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंञी मनोहर उर्फ बाबू आजगावकर, मांदे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे, पेडणे नगराध्यक्षा श्वेता कांबळी व वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर उपस्थित राहणार आहेत.