पेडणे / प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पेडणे मतदारसंघातून मिशन फॉर पेडणेचे निमंत्रक राजन कोरगावकर या स्थानिक उमेदवारालाच भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी धारगळ पंचायत क्षेत्रातील ज्ये÷ भाजप कार्यकर्त्यांनी पञकार परिषदेत धारगळ येथे केली.
धारगळ ग्रामपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते .या पत्रकार परिषदेला गिरीश कामत, संन्यास परब,शिवानी परब ,विंकिता नाईक,रक्षण तळवणेकर,निशा नाईक,रंजीता आरोंदेकर,राजन पालयेकर ,मेघना नाईक,आश्विनी नाईक,यशोदा देवेंद्र,महेश नाईक,विलास हरमलकर,संगम नाईक ,प्रकाश मोरे ,बाबाजी नाईक,पोपट तळवणेकर,दुकळो धारगळकर,महेश च्युरी ,सत्यवान नाईक,बाबी सावंत,राजन वीर ,दिपक एच हे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरीश कामत म्हणाले कि,गेली अनेक वर्षे पेडणे हा राखीव मतदारसंघ असून पेडणे मतदारसंघा बाहेरील उमेदवार निवडुन आलेले आहेत.भाजपने राजन कोरगावकर यांना भाजपची उमेदवारी द्यावी.
स्थानिक उमेदवारालाच स्थानिक समस्यांची चांगली जाण असून ते सुशीक्षीत असल्याने लोक प्रतिनिधी म्हणून मतदारांना योग्य न्याय देऊ शकतील. पक्ष आमच्या भावना लक्षांत घेऊन योग्य निर्णय घेईल याची आम्हाला खात्री आहे. यावेळी बोलताना शिवानी परब म्हणाल्या कि भाजपशी आम्ही गेली अनेक वर्षे एकनिष्टेने कार्य करत आलेलो आहोत पक्षाने आम्हा भाजप कार्य कर्त्यांच्या भावना लक्षांत घेऊन राजन कोरगावकर यांची उमेदवार म्हणून निवड जाहीर करणे योग्य ठरेल. संन्यास शेटये म्हणाले कि,माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे हयात असताना यापुढे पेडणे मतदारसंघा साठी त्यांनी स्थानिक उमेदवार देण्याचे मान्य केले होते.पक्षाने राजन कोरगावकर या स्थानिक उमेदवाराला पेडणे मतदारसंघातुन उमेदवारी देउन मनोहर पर्रीकरांचा शब्द पाळावा.भाजप आमची मागणी मान्य करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. यदाकदाचित आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल असे ते म्हणाले.गोपाळ शेटये यांनीही राजन कोरगावकर या स्थानिक उमेदवारालाच भाजपने उमेदवारी द्यावी असे सांगितले.