प्रतिनिधी /पेडणे
भारतीय जनता पक्षाचा 42 वा स्थापना दिवस पेडणे मतदारसंघात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.पेडणे मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार प्रवीण आलेकर यांच्या कार्यालयात मालपे पेडणे साजरा करण्यात आला. यावेळी पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्ये आणि शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धा?जली वाहिली.
यावेळी बोलताना प्रवीण आर्लेकर यांनी स्थापना दिनानिमित्त पेडणे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना शुभेच्छा दिल्या, मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी मोठय़ा मेहनतीने आपल्याला काम करून पेडणे मतदारसंघातून भाजप पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून दिल्याबद्दल प्रवीण आलेकर याने कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांना धन्यवाद दिले.
यावेळी पेडणे मतदारसंघ भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस , नगराध्यक्ष आणि सरचिटणीस उषा नागवेकर , नगरसेविका अश्विनी पालेकर, नगरसेविका विशाखा गडेकर , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई , उगवे- तांबोसे – मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले सुधीर मळीक, कृष्णा पालेकर , जयेश पालयेकर , आत्माराम केणी , श्रीराम , राजन म्हापसेकरपंच आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी भाजप कार्यकर्त्यांना पक्षाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त आज संपूर्ण देशभर कार्यक्रम राबवले जात असल्याचे सांगून कार्यकर्त्यांच्या जोश आणि त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान पक्षाच्या नेत्यांच्या स्मरणात नेहमीच स्मरणात राहते आसे सांगितले.