मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास : प्रवीण आर्लेकर यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघात मगो पक्षाचे काम करणारे प्रवीण आर्लेकर यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने पेडणे मतदारसंघात भाजप पक्षाचे कमळ फुलणार हे आजच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या उपस्थित जनसमुदायातून दाखवून दिले आहे.प्रवीण आर्लेकर यांना भाजपात महत्त्वाचे स्थान देण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणे येथे दिली.
पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर यांच्या भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रमात डॉ. प्रमोद सावंत बोलत होते .पेडणे येथे व्हायकाऊंट मैदानावर आयोजित केलेल्या प्रवीण आर्लेकर यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे , शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील , रामदास मिहिर , भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस , नगराध्यक्ष उषा नागवेकर , धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, गोवा भाजप अनुसुचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, गोवा राज्य सचिव गौरेश जोसलकर, धारगळचे सरपंच प्रदिप उर्फ भूषण नाईक, उपरसरपंच आराधाना नाईक , पंच सोनाली साळगावकर, पंच सुभाष धारगळकर, पंच सीनिता राऊळ, पंच वल्लभ वराडकर, पंच प्रदिप पटेकर, नगरसेविकाआश्विनी पालयेकर, विशाखा गृडेकर , नगरसेवक माधव शेणवी देसाई, शिवराम तुकोजी , उगवे तांबोसे मोप पंचायतीच्या, सरपंच सरस्वती नाईक , उपसरपंच सुबोध महाले, पंच दीपक तांबोस्कर, ,मधुसुदन सामंत , प्रसादा महाले , दिपक पेडणेकर , तोरसे सरपंच उत्तम वीर , माजी पंच निलेश माटे, माजी सरपंच संगीता गावकर, माजी सरपंच स्वाती गवंडी, पंच मंगलदास किनळेकर, पंच प्रशांत राव , आवेलीन रा?ड्रिग्स, किसान मोर्चा अध्यक्ष उदय प्रभुदेसाई , माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, माजी सरपंच अशोक धावस्कर, विर्नोडा सरपंच अपर्णा परब , पंच मंगलदास किनळेकर, पंच प्रशांत राव , पंच रसिका शेटकरा, नरेश कोरगावकर, आवेलीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
प्रवीण आर्लेकर यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला मैदान तुडुंब भरले. पेडणे मतदारसंघातील विविध भागातून यावेळी कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. प्रवीण आर्लेकर यांची पक्ष प्रवेशाची लाक्षणीक उपस्थितीवरून प्रवीण आर्लेकर यांचा पेडणे मतदारसंघातून विजय निश्चित असल्याचे उपस्थितामध्ये चर्चा सुरू होती.
बाहेरच्यानी गोव्यात येऊन सकाळ करण्याची गरज नाहीः डॉ. प्रमोद सावंत
यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले , गोव्यात बाहेरच्या व्यक्तीने येऊन नवी सकाळ करण्याची गरज नाही,आमची सकाळ आम्ही करणार त्यासाठी दुसऱया लोकांची गरज नाही. यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले मगो व तृणमुल काँग्रेस युती ही का झाली याची सर्वा?ना माहिती आहे. ब?गासाठी ही युती असून प्रवीण आर्लेकर यांनाही ब?ग होती माञ ती त्यांनी नाकारली.कारण त्यांना पेडणेकरांचे हित पाहले आमची संस्कृती पाहिली अशा उमेदवारामागे पेडणेतील जनतेने राहून पेडणे मतदारसंघात कमळ फुलवावे असे आवाहन केले
मगोनो सिंह तृणमुलच्या दावणीला बांधलाः सदानंद शेट तानावडे
गोव्यात तृणमुल आता योजना राबवीतआहे माञ पश्चिम बंगाल मध्ये कितीतरी गरीब जनता आहे त्यांना अगोदर अन्न आणि इतर सवलती द्या. सुदीन ढावळीकर यांनी तृममुलशी युती केली ती का केली असा प्रश्न करत
भाऊसाहेब बांदोडकर यांनी संभाळून ठेवलेला सिंह हा तृणमुलच्या ममता दिदीच्या दावणीला ढवळीकर बंधूनी बांधला आहे. माञ गोव्यातील जनता अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाही. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कोणत्या योजना राबविल्या त्या अगोदर सांगा.मगच गोव्यात योजना रावबिण्याची स्वप्न? बघा असे सदानंद शेट म्हणाले.
मगो पक्ष ही सुदीन ढवळीकर यांची प्रायव्हेट लिमिटेट कंपनीः सोपटे
मगो पक्ष ही सुदिन ढवळीकर यांची प्रायव्हेट लिमिटेट कंपनी आहेः त्यांना दुसऱयाचे काही पडले नाही.त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी तृणमुल पक्षाकडे युती केली असे आमदारा दयानंद सोपटे म्हणाले. प्रवीण हे स्थानिक उमेदवार आहेत त्यांनी धारगळ येथे घर बांधले.बाबूला चार वेळा निवडून दिल्यानंतर अजून पेडणे स्थानिक झाले नाहीत.मडगावाहून त्यांना पेडणेत यावे लागते.माञ आमदार नसताना गेली दोन वर्षे काम करत आहेत त्यांनी जो भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन पक्षात प्रवेश केला त्या निर्णयाचे आपण स्वागत करतो असे सांगून प्रवीण आर्लेकर यांचामुळे पेडणे मतदारसंघात निश्चितच कमळ फुलणार असून पेडणेतील जनतेने प्रवीण आर्लेकर यांच्या मागे उभे रहावे असे आवाहन केले.
पेडणेच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारः प्रवीण आर्लेकर
प्रवीण आर्लेकर यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर यावेळी बोलताना प्रवीण आर्लेकर म्हणाले की, आपण पेडणे मतदारसंघातील लोकांना सोबत घेऊन काम करणार.आपण कोविड काळात काम केले.आपण आपला पाठिंबा देऊन आपणास आमदार करावे, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.