प्रतिनिधी /पेडणे
पेडणे आणि मांदे मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार असल्याचा पेडणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर आणि मांदेचे भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे दावा केला आहे.
पेडणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्या वडिलांचे निधन होऊन मंगळवारी बारा दिवस झाले. सकाळी प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या घरी धारगळ येथे वडिलांच्या बाराव्यादिनी त्यांना श्रद्धाजली वाहिली. संपूर्ण दिवसभर ते आपल्या घरी राहिले. यावेळी पेडणे मतदारसंघातील आणि गोवा राज्यातील त्यांच्या नातेवाईकांनी व मित्र परिवारासह समर्थकांनी घरी भेट घेऊन त्यांच्या वडिलांना
श्रद्धांजली वाहिली.
ऐन निवडणुकीच्या काळातच प्रवीण आर्लेकर यांचे वडील प्रभाकर आर्लेकर यांचे निधन झाले होते. ते दुःखात असतानाही त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक तसेच कुटुंबियांनी त्यांना धीर देत प्रचाराची धुरा संभाळली होती. याबाबत आर्लेकर यांनी त्यांचे अभार व्यक्त केले.
कार्यकर्ते, मतदारांमुळे आपला विजय निश्चित : प्रवीण आर्लेकर
पेडणे मतदारसंघाचे भाजप पक्षाचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांची भेट घेतली असता पेडणे मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते, मतदार आणि आपले मित्र तसेच हितचिंतक यांनी माझ्यासाठी अथक परिश्रम घेतले. ज्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्यावेळी माझ्या मागे माझे कार्यकर्ते खंभीरपणे उभे राहिले. तसेच पेडणेच्या जनतेने सहकार्य केले. मला मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळेच माझा विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा दावा प्रवीण आर्लेकर यांनी केला आहे.
दरम्यान, मांदे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी मांदे मतदारसंघातून आपला विजय निश्चित आहे, असा दावाह केला आहे.