पेडणे / (प्रतिनिधी )
कोटकरवाडा येथे रविवारी दुपारी दुचाकीची धडक व्हेगानर कारला बसल्याने नईबाग येथील दुचाकी चालक जुवांव फर्नांडिस (वय 73) यांचा तुये इस्पितळात उपचार दरम्यान मृत्यू झाला.
नईबाग येथील जुवांव फर्नांडिस हे आपल्या मोटरसायकलने कोरगाव या रस्त्यावरून पेडणे येथे जात असताना कोटकारवाडा येथे वळणावर पोचले असता त्यांच्या दुचाकीची धडक पेडणेहून येणाऱया व्हेगानर जी.ए.03 सी. 9657 या कारला बसली. या झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्मयाला इजा झाली. त्यांना तुये येथील इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पेडणे पोलीस स्थानकाचे हवालदार पेलू तुयेकर यांनी अपघाताचा पंचनाम करुन कार चालकावर गुन्हा नोंद केला.