प्रतिनिधी/पेडणे :
पेडणे रेल्वे स्टेशनवर अचानक 72 मजूर एकत्रित आल्याने सर्वत्र गोंधळ उडाला .मजूर एकत्रित जमल्याची माहिती पेडणे मामलेदार अनंत मळीक आणि पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी पोचले .हि घटना 29 रोजी सायंकाळी घडली .
सविस्तर माहिती नुसार बेती येथून एका मोठय़ा ट्रोलीला हात दाखावून हे मजूर त्या ट्रोलीत बसले आणि पेडणे रेल्वे स्टेशनवर आले . त्यावेळी त्यांच्या लक्षात आले कि जाण्यासाठी रेल्वे सेवा नाही . बेती येथून हे मजूर आले ते उत्तर प्रदेश येथील आहेत .पेडणे पोलिसांनी लगेच पर्वरी पोलीस स्टेशनला कळवून वाहने मागवली . ती आल्यावर परत त्यांना बेती येथे सोडणार असल्याची माहिती पेडणेचे मामलेदार अनंत मळीक यांनी दिली .ज्या ट्रक किंवा ट्रोलीत हे मजूर बसून आले त्या वाहनांचा तपास चालू आहे .