पेडणे / प्रतिनिधी
पेडणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने यंदा मंडळाला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचा उत्सव हा भवदिव्य तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमानिशी साजरा करण्याचा निर्णय आणि संकल्प गेल्यावषी श्री देवीभगवती कडे केला होता माञ यंदा कोरोनाचे संकट आल्याने या महामारीचा ञास इतर नागरिकांना होऊ नये यासाठी पेडणे सार्वजनिक मंडळाच्या पदाधिका-याने अत्यंत साधेपणाने यंदा अकरा दिवस गणपतीचे पूजन तेही यंदा 50 वर्षे मंडळाला होत असल्याने सर्व सरकारी नियम पाळून गणपतीचे पूजन करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
पेडणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक शनिवारी सायंकाळी श्री भगवती हायस्कूल सभागृहात घेण्यात आली. पेडणे सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम कोटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर पालयेकर, खजिनदार आना कवठणकर, सचिव प्रशांत
नागवेकर , माजी अध्यक्ष विश्वनाथ तिरोडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
ड़ यंदाचा उत्सव हा अत्यंत साधापणाने साजरा करुयाः परशुराम कोटकर
ट्रस्टचे अध्यक्ष परशुराम कोटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की यंदामंडळाला पन्नास वर्षे होत आहे. दरवषी मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य दिव्य विद्युत रोषणाई करत हा उत्सव गेली 49 वर्षे साजरा करत आले.माञ कोरोनाचे संकट लक्षात घेता यंदा आम्ही सर्वांनी पन्नास वर्षे जरी मंडळाला होत असली आणि यापूर्वी पन्नासावे वर्षात भव्यदिव्य कार्यक्रम करण्याचे पूर्वी ठरविलेअसलेतरी यंदा आम्ही अत्यंत साधेपणाने अकरा दिवस गणपतीचे पूजन करुन गर्दी न करता व सरकाराच्या नियमाना कुठेही बाधा न आणता साजरा करुया असे सांगितले .
सरकारी नियमाचे पालन करत यंदा उत्सव साधेपणाने साजरा करुयाः मधुकर पालयेकर
पेडणे गणेशोत्सव मंडळ यंदा 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे.ही मंडळाच्या दृष्टीने तसेच सर्व गणेश भक्तांच्या दृष्टीने आंनदाची बाब आहे.माञ सुवर्ण महोत्सव वर्ष असून सुध्दा मंडळ यंदा भव्यपणाने कार्यक्रम न करता ते साधेपणाने यंदा फक्त गणपती पूजन व सायंकाळी मर्यादित लोकांनाच घेऊन आरती करुन अकरा दिवस गणपतीचे भक्तीभावे पूजन करुया आणि हे पन्नासावे वर्ष साजरे करुया असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष मधुकर पालयेकर यांनी सांगितले .
सरकारी नियमाचे काटोकोरपणे पालन करत उत्सव साजरा करुया ः मधुकर पालयेकर
सरकारच्या नियमाना बाधा न आणता तसेच नियमाचा भंग न करता ठराविक लोकांना घेऊन यंदा पन्नास वर्ष होत असल्याने आणि श्री भगवती आणि गणपतीच्या चरणी यापूर्वी केलेला संकल्प म्हणूनच यंदा अकरा दिवस कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता गर्दी न जमविता यंदा गणपतीचे पूजन केल्यानंतर दारदिवशी सकाळी पूजा व सायंकाळी आरतीचा कार्यक्रम तेही ठराविक मर्यादित लोकांना घेऊन करुया असे आवाहन मधुकर पालयेकर यांनी केले. यावेळीसर्वांनी त्याला संमती दर्शविली.
ड़ गणपती दर्शन घेण्यासाठी भाविक आल्यास मास्क सॕनिटायझर वापर महत्त्वाचा
यावेळी बैठकीत भाविक गणपती दर्शनासाठी आल्यास त्यांना मर्यादित संख्येनेच आत दर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जाईल.भाविकांना मास्क तसेच सॕनिटायझर हाताला लावूनच दर्शन घेता येईल.
ड़ यंदा भाविकांना गणपतीच्या चरणी अभिषेक करायला मिळणार नाही. यंदा महाप्रसादाची सोय नसणार तसेच अकराव्या दिवशी 4.30 वाजता गणपती विसर्जनासाठी निघणार आणि सायंकाळी पाच पर्यत हे विसर्जन गांधीतीर येथे होणार. भाविकांनी विसर्जनासाठी येऊ नये यासाठी मंडळाने दिलगीरी व्यक्त केली आहे. भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहान ट्रस्टचे अध्यक्ष परशुराम कोटकर व मंडळ अध्यक्ष मधुकर पालयेकर यांनी केले आहे.
बैठकीत झालेल्या चर्चेत विश्वनाथ तिरोडकर, अभय कामुलकर , प्रशांत गडेकर, बाबलो नागवेकर, महादेव गवंडी, आनंद सावळ देसाई, प्रविण कोटकर , नारायण मयेकर, गोपिचंद आपुले, बापू सावळ देसाई, प्रशांत नागवेकर ,.मोहन आरोंदेकर , जयेश पालयेकर, संदेश सावळ देसाई,नवनीत वेर्णेकर, रामा नागवेकर आदीनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी खजिनदार आना कवठणकरयांनी मागील वर्षाच्या उत्सवाच्या जमा खर्च सादर केला.बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. आभार अभय कामुलकर यांनी मानले.