पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे येथील जुन्या आणि यंदा 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे अकराव्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी गांधीतीर खारेबांध येथे तेरेखोल नदीपाञात अत्यंत साधा पध्दतीने विधिवत विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी 4 वाजता उत्तरपूजा पूजा करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक साकडे पुरोहित गोविंद पराष्टेकर यांनी घातले. श्रींची मिरवणुकीत सामाजिक अंतर ठेवून काढून गांधीतीर येथे नेण्यात आले.तिथे तेरेखोल नदीपाञात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी पेडणे सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम कोटकर, मंडळाचे अध्यक्ष मधुकर पालयेकर , अभय कामुलकर , बापू सावळ , हरिश्चद्र नागवेकर, विश्वनाथ तिरोडकर, प्रविण कोटकर, आना कवठणकर, शेखर पेडणेकर, रुदेश नागवेकर, नगरसेवक प्रशांत गडेकर, नगरसेवक सिध्देश पेडणेकर , सुभाष कोरगावकर, कृष्णा पालयेकर, जयेश पालयेकर , माधव शेणवी देसाई, आनंद सावळ देसाई , संदेश सावळ देसाई, चंदन सातार्डेकर, आदी पदाधिकारी व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.