पाटर्य़ा करणार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिक सज्ज
प्रतिनिधी / सातारा
सातार्यातील पेढय़ाचा भैरोबा हे देवस्थान प्रसिद्ध आहे. ब्रेक द चेनच्या काळात काही मंडळी रात्रीच्या वेळी या देवस्थानच्या परिसरात जाणार्या रस्त्यावर पाटर्य़ा करतात. असे चालणारे प्रकार बंद करण्यासाठी त्या परिसरातील नागरिक एक होऊन हातात दांडके घेवून कारवाई करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात होणार्या पाटर्य़ाना आता लगाम लागणार आहे.
शहरात नव्याने हद्दीत आलेल्या शाहुपूरीतील काही भागामध्ये पेढय़ाच्या भैरोबाचाही समावेश आहे. या ठिकाणाला मोठे महत्व आहे. पेढय़ाच्या भैरोबा या देवस्थानाकडे जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग आहे. याच मार्गावर रात्रीच्या सुमारास लॉकडाऊनच्या काळात अनेक मध्यपींच्या ओल्या पाटर्य़ा रंगत असतात. रस्त्यावरच चुलवांड मांडून दारुच्या पाटर्य़ा रंगत असल्याचे दुसर्या दिवशीच्या खुणांवरुन दिसते. त्यामुळे या परिसराची सामाजिक शांतता धोक्यात येण्याची चिन्हे असून अशा पाटर्य़ा बंद करण्यासाठी आता त्याच परिसरातील नागरिकांनी एकी दाखवत अशा नागरिकांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक या पाटर्य़ा हाणून पाडण्यासाठी गस्त घालणार आहे. तत्पुर्वी शाहुपूरी पोलिसांनी याकडे लक्ष देवून या होणार्या पाटर्य़ा बंद करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनी केले नियोजन
पेढयाचा भैरोबा परिसर विद्रूप करणार्या मद्यपींचा बंदोबस्त करावा. ग्रामदैवत, श्रध्दास्थान श्री पेढयाचा भैरोबा मंदिराकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता तसेच पायरीचा रस्ता आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी दारूच्या बाटल्या फोडून रस्त्यावर पायरीत चूल मांडून मांसाहारी पाटर्य़ा करून मद्यपींनी धिंगाणा सुरू केला आहे. त्यामुळे आपल्या निसर्गरम्य असलेल्या परिसराचे विद्रुपीकरण सुरू केले आहे. मदयपींचे असले घाणेरडे प्रकार वेळीच हाणून पाडले पाहिजेत, याकरता स्थानिकांनी एक ग्रुप तयार केलेला आहे. निसर्गरम्य म्हणून ओळखला जाणार्या परिसराचे रक्षण करण्यासाठी या ग्रुपमधील सदस्य असे प्रकार निदर्शनास आल्यास वेळीच रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.