वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडच्या लीग फुटबॉल स्पर्धेतील व्यवस्थापक संघटनेतर्फे मँचेस्टर सिटी क्लबचे व्यवस्थापक पेप गार्डिओला यांची 2021 सालातील इंग्लंडमधील सर्वोत्तम व्यवस्थापक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर सिटी क्लबने 2021 च्या फुटबॉल हंगामात प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धा तसेच लीग चषक स्पर्धा जिंकली. गार्डिओला हे यापूर्वी बार्सिलोना आणि बायर्न म्युनिच संघाचे व्यवस्थापक होते.