घरी येणाऱ्या पाहुण्यांना सरबत दिलं जातं. एखाद्या प्रसंगी वेलकम ड्रिंक दिलं जातं. फ्रूट पंच, कलिंगड ज्यूस असे प्रकार तुम्ही बरेचदा प्यायले असतील. मग वेगळेपणासाठी पेरुची थंडाई बनवून बघायला हरकत नाही.
साहित्यः एक ग्लास दूध, अर्धा ग्लास पेरूचा रस, अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, पाव कप पिस्ता, अर्धा चमचा मिरी, दोन चमचे वेलची पूड, एक चमचा बडिशेप
कृतीः गॅसवर कढई ठेवा. बदाम, पिस्ते आणि काजू थोडे भाजून घ्या. भाजलेला सुका मेवा बाजूला ठेवा. आता बडिशेपही भाजून घ्या. यानंतर काजू, बदाम, पिस्ता, बडिशेप, काळी मिरी, गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये एकत्रितपणे वाटून घ्या. यात वेलची पूड घाला. उपलब्ध असल्यास केशरही घालता येईल. तुमचं थंडाई मिक्स तयार आहे. थंडाई बनवण्यासाठी अर्धा ग्लास दुधात दोन चमचे थंडाई मिक्स आणि पेरूचा रस घाला. सर्व घटक नीट मिसळून घ्या. यात बर्फाचे तुकडे घालता येतील.