लीमा
मागच्या वर्षी पेरूमधील लिबर्टाड क्षेत्रातील स्थानिक शेतकऱयांना एका प्राचीन धार्मिक स्थळाचे अवशेष मिळाले असून तेथे सविस्तरपणे शोध घेतल्यानंतर संशोधकांना खूप जुनी भिंतीवरील पेटिंग्ज आढळून आली आहेत. यामध्ये सदरची पेटिंग्ज 3200 वर्षे जुनी असून यामध्ये देवतांची चित्रे असून देवतांनी चाकू हातात पकडला असल्याचे दिसून येत आहे. गार्जियनच्या अहवालानुसार या ठिकाणी शेतकऱयांची संख्या मोठी असून शेतकऱयांच्या उपकरणांमुळे पेंटिंग्ज खराब झाली आहेत. परंतु सध्या हे ठिकाण सुरक्षित करुन त्याची डागडुजी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अगुस्टो एन वीज फाउंडेशनचे पुरातत्व विभागाचे संचालक रेग्युलो प्रँको जॉर्डन यांनी दिलेल्या माहितीनुसार या पेंटिंग्जमध्ये असलेल्या चित्रांनुसार या ठिकाणचे लोक हे नदीजवळ असल्यामुळे जल देवतांची पूजा करत असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच हजारो वर्षांपूर्वी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासोबत अन्य कार्यक्रम या ठिकाणी होत असण्याची शक्यताही सदर अहवालामधून दिलेली आहे.