ऑनलाईन टीम / प्रेटोरिया :
दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पेरुचा जगात पाचवा तर दक्षिण आफ्रिकेचा सहावा क्रमांक लागतो.
पेरूमध्ये आतापर्यंत 6 लाख 29 हजार 961 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामधील 4 लाख 38 हजार 017 जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 लाख 63 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1517 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 28 हजार 471 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 6 लाख 20 हजार 132कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामधील 5 लाख 33 हजार 935 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 72 हजार 454 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 539 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 13 हजार 743 जण दगावले आहेत.