पी के क्वॉर्टर्स येथील समस्या : दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
येथील पी के क्वॉर्टर्सनजीक स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पेव्हर्स बसवून नागरिकांना ये-जा करण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. मात्र येथील ड्रेनेज ब्लॉक झाल्याने पेव्हर्समधून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून जाणे कठीण बनले असून समस्या निर्माण झाली आहे.
येथील स्मार्ट सिटीचे काम हाती घेण्याआधी ड्रेनेज दुरुस्त करणे गरजेचे होते. असे न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. ड्रेनेजची त्वरित दुरुस्तीची मागणी होत आहे.