नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला २३ वर्षीय पैलवान सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर पैलवान सुशील कुमारला भारतीय रेल्वे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमारच्या निलंबनाची माहिती उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सुशील कुमारने दोन वेळा ऑलंपिक पदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमाचा सन्मान म्हणून उत्तर रेल्वेने त्याला ऑफिसन ऑन स्पेशल ड्यूटी हे पद दिलं होतं. आता त्याच पदावरुन सुशील कुमारचं निंलबन करत असल्याची माहिती उत्तर रेल्वेनं दिली आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप असून त्याचा तपास सुरु आहे, यामुळे त्याला नोकरीवर ठेवता येणार नाही असं रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवान सागर धनखरच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या ऑलिम्पिक पदकविजेता पैलवान सुशील कुमारला दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवलं आहे. सुशीलचा साथीदार अजय यालाही कोर्टाने 6 दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवलं आहे.