प्रतिनिधी / दापोली
पैसे न दिल्याच्या रागातून तीघा सख्या भावांनी फाईज रखांगे या तरूणावर ब्लेडने सपासप वार केले. या प्रकरणी तीन सख्या भावांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली एस. टी. बस स्थानका जवळील गल्लीमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने सुसंस्कृत शांत समजल्या जाणाऱया दापोलीत खळबळ उडाली आहे.
दापोली पोलीसांनी या प्रकरणी सैफअल्ली नासीर मुल्ला-वय 21, साद नासीर मुल्ला-वय 18, साकीब नासीर मुल्ला-वय 20 यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकाराने दापोलीत खळबळ उडाली आहे.