शिरगावमधील महिलेचा मृत्यू : आणखी आठजण कोरोनामुक्त : कंटेनमेंट झोनमध्ये वाढ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गुरुवारी आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत दोघांचे बळी गेले आहेत. देवगड तालुक्मयातील शिरगाव येथील 63 वषीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आठ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 16 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गुरुवारी आणखी सहाजणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 99 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
यापूर्वी मुंबईहून आलेल्या देवगड तालुक्यातील टेंबवली-कालवी येथील 79 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर देवगड तालुक्यातीलच शिरगाव येथील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. पनवेल येथून आलेल्या या महिलेचा 28 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल 2 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आला. त्यानंतर गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये तिचा मृत्यू झाला.
जिल्हय़ात नव्याने आढळले सहा रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये गुरुवारी आणखी नव्याने सहा रुग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या सहा रुग्णांपैकी सावंतवाडी तालुक्यातील तीन रुग्ण असून त्यात ओटवणे, सावंतवाडी आणि चौकुळ येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. देवगड तालुक्यातील नाद येथील एक, कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील एक आणि कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील एक या प्रमाणे एकूण सहा नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आणखी आठ रुग्ण झाले कोरोनामुक्त
3 जूनपर्यंत कोरोना बाधित 93 रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुरुवारी नवीन सहा रुग्ण आढळल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. तर दुसरीकडे जिल्हय़ात एकूण 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच जिल्हय़ात दोघांचा मृत्यू आणि एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 80 रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचाराखाली आहेत.
कंटेनमेंट झोनमध्ये वाढ
जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्मयात पुढीलप्रमाणे कंटेनमेंट झोन आहेत. तळेरे, नाटळ, कुरंगवणे, नवीन कुर्ली वसाहत, जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्मयात मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, कोळपे व मेहबूबनगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे हे कंटेनमेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्मयात कारिवडे गावठणवाडी, माडखोल येथील बामणादेवीवाडी, निरवडे माळकरवाडी, बांदा गाव गवळीटेंबवाडी, असनिये येथील भटवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. कुडाळ तालुक्मयात पणदूर-मयेकरवाडी, आंब्रड वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, पडवे गावची पडवे पहिलीवाडी, गावराई टेंबवाडी, रानबांबुळी पालकरवाडी. मालवण तालुक्मयात हिवाळे, सुकळवाड राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ले तालुक्मयात मातोंड हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
शासकीय संस्था अलगीकरणातील व्यक्ती 553
गावपातळीवरील अलगीकरणातील व्यक्ती 23159
नागरी क्षेत्रातील अलगीकरणातील व्यक्ती 1346
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2198
अहवाल प्राप्त झालेले नमुने 2131
आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 99
निगेटिव्ह आलेले नमुने 2029
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 69
सद्यस्थितीत जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रुग्ण 80
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 16
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 71
गुरुवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 5858
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 71502
कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय स्थिती
कणकवली 34
मालवण 15
कुडाळ 15
सावंतवाडी 14
देवगड 10
वैभववाडा 08
वेंगुर्ले 03
एकूण 99