ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कथित प्रेम प्रकरणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पाॅर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्स हिला न्यायालयीन खटल्यादरम्यानचा सर्व खर्च देण्यासाठी 44,100 डॉलर देण्याचे आदेश तेथील न्यायालयाने ट्रम्प यांना दिले आहेत.
ट्रम्प यांच्यासोबत कथित प्रेम प्रकरणानंतर शांत राहण्यासाठी पैसे देण्यात आले असल्याचे पॉर्न स्टारचे म्हणणे आहे. 2006 मध्ये ट्रम्प यांच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा तिने केला आहे. दरम्यान, पॉर्न स्टार आणि ट्रम्प यांच्यातील लैंगिक संबंधांबाबत गुप्तता पाळण्यासाठी ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणूकीपूर्वी डॅनिएल्सबरोबर करार करत तिला एक लाख तीस हजार डॉलर दिले होते, असा आरोप तेथील स्थानिक वृत्तपत्राने केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. ट्रम्प यांनी याचे स्पष्टपणे खंडन केले होते.
त्यानंतर स्टॉर्मी डॅनिएल्सने ट्रम्प यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल केला होता. त्यानंतर कॅलिफोर्नियातील कोर्टाने ट्रम्प यांना डॅनिएल्सने खटल्यादरम्यान खर्च केलेले सर्व पैसे ट्रम्प यांना देण्याचे आदेश दिले.