ऑल इंडिया डेमॉक्रेटिक विद्यार्थी ऑर्गनायझेशनची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारने डिप्लोमासह इतर सर्व परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी ऑल इंडिया डेमॉक्रेटिक विद्यार्थी ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. काही परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले आहे. तर काही परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या परीक्षाच रद्द कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे राज्यात शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविले नाही तर विद्यार्थी परीक्षा कशी देणार? महत्त्वाचे म्हणजे एकाचवेळी दोन सेमिस्टरच्या परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण एकाचवेळी एकच सेमिस्टर घ्यावी तसेच दुसऱया सेमिस्टरसाठी वेळ द्यावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी राजू गाणगी, वैभव सुतार, विनायक मरकट्टी, प्रवीण गाणगेर, पवन चाळके, सुदीप, आदर्श, गोपी पत्तार यांच्यासह इतर विद्यार्थी उपस्थित होते.