नवी दिल्ली : सॉफ्टबँकेचा वरदहस्त असणारी ऑनलाइन विमा क्षेत्रातील बहुराष्ट्रीय वित्त तंत्रज्ञान कंपनी पॉलिसीबाजार आपला आयपीओ आणण्याची तयारी करते आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत कंपनी 6 हजार 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी अशा प्रकारे बाजारात आयपीओ दाखल करणारी पॉलिसीबाजार ही पाचवी स्टार्टअप कंपनी ठरली आहे. नव्या समभागांसह आयपीओ आणला जाणार असून आधीच्या गुंतवणूकदारांना हिस्सेदारी विकण्याची संधी असणार आहे. लवकरच पॉलिसीबाजार आपला आयपीओसंदर्भातला अर्ज शेअर बाजारातील नियामक सेबीकडे सादर करणार आहे. आयपीओ येत्या डिसेंबरपर्यंत दाखल होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
Previous Articleटोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.