800 कोटी रुपये उभारण्याचे संकेत : नेटवर्क विस्तारण्याची योजना
वृत्तसंस्था / मुंबई
इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशनमध्ये कार्यरत असणारी सरकारी कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनकडून इफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट ट्रस्ट (इनविट) आयपीओ आणण्याची योजना तयार करण्यात आली आहे. याच्या आधारे कंपनी जवळपास 8 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याचे संकेत आहेत. पॉवरग्रिडचा समभाग सध्या 192 रुपयांवर कार्यरत आहे. याचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयांवर असल्याची माहिती आहे.
सदरचा आयपीओ मार्चपर्यंत लाँच करण्याचे संकेत आहेत. मागील वर्षात सप्टेंबरमध्ये कॅबिनेट ऑफ इकॉनॉमिक अफेयर्सनं पॉवरग्रिडला संपत्तीच्या आधारे रक्कम जमा करण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती.
सरकारला मिळणार मदत
सरकारने चालू आर्थिक वर्षात 2.10 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यातून सरकारला इनविट इश्यूमधून पॉवर ग्रिडला ट्रान्समिशन नेटवर्क विस्तारासाठी नवीन गुंतवणूक प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. याआधारे कर्ज घटविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.