बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर त्यांच्या वडिलांच्या समाधी शेजारीच पुनीतचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि कुटुंबीयांनी घेतला. अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर आज सकाळी बेंगळूरच्या कांतीरवा स्टुडिओ परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुनीतची पत्नी अश्विनी यांच्याकडे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कांतीरवा स्टुडिओ परिसरात पुनीतच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. अभिनेता पुनीतच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कुटुंबीयांसह चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, राजकीय नेते आणि चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते..