तुर्की येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
प्रतिनिधी/कळंबा
डिसेंबर महिन्यात इस्तांबुल, तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी कळंबा(ता. करवीर ) येथील खेळाडू शुभांगी शिवाजी पाटील हिची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला आर्थिक मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी तीला साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ती महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आशिया या संस्थेची ची खेळाडू आहे. 24 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत तिची सध्या इस्तांबूल, तुर्की येथे होणाऱ्या जुनिअर आणि सिनियर गटाच्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी ज्युनिअर 21 वर्षा खालील भारतीय संघात निवड झालेली आहे.
दरम्यान, ज्युनियर बेंच प्रेस नॅशनल पॉवर लिफ्टिंग 2020 – 21 गोवा, माडगाव येथे 16 नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 52 किलो गट मध्ये शुभंगीने 3 रे स्थान पटकाविले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना शुभांगीने जबाबदारी पेलत चमकदार अशी कामगिरी केली होती. इस्तांबूल, तुर्की येथील स्पर्धेसाठी 2 लाख रुपये इतका खर्च असून शुभांगी घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला मदतीची गरज आहे. सामाजिक मध्यमातून जमेल तितका खर्च देऊन आपल्या राज्याचे तसेच देशाचे नाव लौकिक मिळवण्यास मदत करावी त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटनांनी तिला आर्थिक बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.