वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये पोकोचा ‘एक्स 3 प्रो’ हा दमदार स्मार्टफोन चालू महिन्यातील 30 तारखेला सादर होणार आहे. अशी माहिती कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. पोको एक्स 3 प्रो मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे मॉडेल आहे. यासोबतच कंपनीने या स्मार्टफोनच्या किमती संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
पोकोने सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनचे प्रो मॉडेल 30 मार्च रोजी सादर करण्यात येणार असून ट्वीटमध्ये फोनच्या कोणत्याही नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु पोको एक्स 3 प्रो हेच मॉडेल राहणार असल्याचे दाट संकेत व्यक्त केले जात आहेत.
सुविधा व किंमत
w बेस 6 जीबी रॅम मॉडेल किमत जवळपास 21,600 रुपये
w8 जीबी रॅम मॉडेलची किमत जवळपास 26,000 रुपये
wफोनला ब्लॅक, ब्लू आणि ब्रोंज कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.
wपोको एक्स 3प्रोमध्ये 120 एचझेड रिप्रेश, एचडी डिस्प्ले
wक्वालकॉम स्नॅपड्रगन 860 प्रोसेसर
-5200 एमएएच क्षमतेची बॅटरी