प्रतिनिधी/ सातारा
अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याने आंदोरी (ता.खंडाळा) नितीन अर्जुन जाधव (वय 24) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुह्यात न्यायालयाने त्याला 10 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पिडित अल्पवयीन मुलीच्या मामाचे नवीन घराचे बांधकाम चव्हाणवस्ती (ता.खंडाळ) येथे सुरू होते. नितीन हा बांधकाम करण्यास येत होता, यावेळी मुलीशी त्याची ओळख झाली. तिला लग्नाचे अमिष दाखवून स्वतःच्या मोटर सायकलवरून पळवून नेहले. ती अल्पवयीन आहे हे माहिती असताना 30 मार्च ते 28 एप्रिल 2018 या महिन्यात तिच्यावर जबरदस्तीने तिच्या समंतीशिवाय शरीर संबंध ठेवले. याची तक्रार तिच्या मामाने लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली. या गुह्याचा तपास लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. पवार यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या केसमध्ये एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीवरून पोक्सो कलमातंर्गत आरोपी नितीन याला 10 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंड, व हा दंड न दिल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेंद यादव, पोलीस हवालदार शमशुदिन शेख, पोलीस हवालदार गजानन फरांदे, पोलीस हवालदार एम. के. मणेर, महिला पोलीस नाईक रिहाना शेख, पोलीस कॉन्टेबल राजेंद्र कुंभार, महिला पोलीस कॉन्टेबल अश्विनी घोरपडे, पोलीस कॉन्टेबल भरते यांनी मदत केली.