प्रतिनिधी / ओरोस:
शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली दोषी धरून विशेष जिल्हा न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी आरोपी अनिल दासो लिंडा (२८) याला विविध कलमांखाली १० वर्षे कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षा तर्फे अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.