वार्ताहर/ मायणी
तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या पोक्सो गुन्हय़ातील आरोपीस मायणी पोलिसांकडून अटक करण्यात यश मिळाले असल्याची माहिती मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.
यासंदर्भात पालीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, वडूज पोलीस ठाण्यांतर्गत मायणी पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील पोक्सो गुन्हय़ातील आरोपीस अंबरनाथ, जि. ठाणे येथे सापळा रचून पकडण्यात पोलीस विभागास यश आले आहे. सन 2018 मध्ये अल्पवयीन मुलीसोबत लग्नग्न करून ती अल्पवयीन आहे हे माहित असताना सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. जून 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याने तिने डॉक्टरांकडे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. त्यामुळे लैंगिक छळाला वैतागून फिर्यादी हिने लखन सकट यांचे विरुद्ध वडूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक शहाजी गोसावी करत होते. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा फरार होता. पोलीस पथकाने त्याचा शोध घेतला मात्र तो सापडत नव्हता. तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला व मोबाईल लोकेशननुसार सापळा रचून त्याला अंबरनाथ जि. ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला दि. 26 ऑक्टोबरअखेर पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पो.कॉ.गणेश शिरकुळे, पो.कॉ.मकसूद शिकलगार, पो. कॉ. अर्जुन खाडे व होमगार्ड वैभव देशमुख यांनी केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी करत आहेत.