वारणानगर / प्रतिनिधी
पोखले ता. पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत प्रचारात फिरत असल्याच्या कारणास्तव एकास ऊसाच्या बुडक्याने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी तिघांवर कोडोली पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे यातील जखमी दादासो वसंत पाटील वय ४५ रा. पोखले यानी फिर्याद नोंदवली आहे.
यातील संशयीत आरोपी अशोक रामचंद्र जाधव, अजित दिलीप पाटील , सचीन सदाशिव पाटील सर्व रा.पोखले या तिघांनी दि. ६ रोजी दुपारी ३ वा. वारणानगर ता. पन्हाळा येथील के.डी.सी. बॅंक शाखेसमोरील चौकात फिर्यादी दादासो यांना ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करत फिरलेचे कारणावरुन व तु गावात प्रचार करत फिरायचे नाही. असे म्हणुन शिवीगाळ करुन तेथे पडलेले ऊसाने पाठीत कपाळावर मारहाण करुन तसेच लाथाबुक्कयांनी मारहाण करुन परत मारणेची धमकी दिले बाबत फिर्याद रात्री उशिरा नोंदवली आहे. पुढील तपास पो.ना.परीट हे करीत आहेत .