इचलकरंजी / प्रतिनिधी
औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने कबनुर (तालुका हातकणंगले) येथील निर्दयी पित्याने पाच वर्षीय मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बापाने या कृत्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे.
अफांन सिकंदर मुल्ला( वय 5 रा पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे त्या मुलाचे नाव आहे. तर पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) यास शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
कबुनूर येथे राहणारा सिकंदर मुल्ला मिळेल मजुरीचे काम करतो तो ही अपंग आहे गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या कौटुंबिक वाद आहे. त्यातच दारूच्या नशेत तो अनेक वेळा घराबाहेरच असतो त्याला त्याला दहा वर्षाची मुलगी व अफान अशी दोन मुले आहेत. अफान याला फिटचा आजार आह. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाचे कारणावरून ही त्यांच्या सतत वाद असत सिकंदर हा दोन दिवस घराबाहेर होता घरी परतल्यानंतर त्याच्या पत्नीचे व नातेवाईकांनी त्याला चांगलेच सुनावले. मुलाचा औषधोपचाराचा खर्च तरी बघ असे असे सांगितले. या कारणावरून सिकंदर चिडून होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी जावू या असे सांगून तो सायकलवरून अफान ला घेऊन घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याची नातेवाईकांना सांगितले. काही वेळा नातेवाईक व नागरिकांनाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. मात्र त्याला शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले कसून चौकशी करता त्याने अफान यास पंचगंगा नदीतील वरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत अफान याचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. आज पहाटे सकाळपासून पुन्हा त्याचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. तपासबाबत सूचना केल्या मुलांना नदीत फेकल्याची गेल्या दोन महिन्यांतील परिसरातील ही तिसरी घटना आहे या मुळे खळबळ उडाली आहे.