बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे बी. एस. येडियुरप्पा यांनी आरआर नगर आणि सीरा विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असे ते म्हणाले. कॉंग्रेसने कदाचित हे मनावर घेतले नसेल पण निकाल लागल्यानंतर सत्य काय आहे ते समजेल.
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी रविवारी सत्ताधारी भाजपने राजाराजेश्वरी नगर आणि सिरा विधानसभा पोटनिवडणुका जिकंण्याचा विश्वास व्यक्त केला. १० नोव्हेंबरला होणाऱ्या निकाला वेळी मोठ्या फरकाने उमेदवार विजयी घोषित होतील.
आम्ही आरआर नगरला३५-४० हजारांच्या फरकाने जिंकू. तसेच मतांच्या फरकाने) जिंकू. तसेच सीरामध्येही आम्ही जवळपास २०-२५ हजार मतांच्या तर्काने जिंकू. असा विश्वस येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. येडियुरप्पा यांनी मी निवडणुका होण्यापूर्वी या बाबतीत सांगितले असल्याचे पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की कॉंग्रेसने बहुधा आमचे म्हणणे मनावर घेतलेले दिसत नाही. त्यामुळे निकाल लागल्यानंतर सत्य काय आहे हे समजेल. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, १० नोव्हेंबरला निकाल नंतर हे सिद्धरामय्या यांना कळेल. मी त्यांना शुभेच्छा देतो. सिद्धरामय्या यांनी कमी मताचा काँग्रेसला फायदा होणार असल्याचे म्हंटले आहे.