बेंगळूर
सिरा आणि राजराजेश्वरीनगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी व्यक्त केला. शिकारीपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आपल्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या विकासकामांमुळे दोन्ही मतदारसंघातील नागरिक भाजप उमेदवारालाच मते देतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, सिंगदूरु मंदिरात पुजारी आणि विश्वस्थ मंडळामधील गोंधळाबाबत जिल्हाधिकाऱयांशी त्यांनी चर्चा केली.
मंदिरात अशा घटना घडू नयेत, मंदिर मजराई खात्यात समावेश करण्याबाबत जिल्हा पालकमंत्री ईश्वरप्पा, आमदार हालप्पा, कुमार बंगारप्पा यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱयांकडून अहवाल मागविला जाईल, असेही येडियुराप्पा यांनी सांगितले.