बेंगळूर : लवकरच राज्यात पोटनिवडणुकीची घोषणा होणार आहे. चार जागांच्या या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांच विजय होणार आहे, असा दावा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केला. शिमोगा जिल्हय़ातील डिव्हीजन विरशैव हॉस्टेलच्या कोनशिला समारंभात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बेळगाव लोकसभा तसेच मस्की, सिंदगी, बसवकल्याण विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. या मतदारसंघांसाठी पक्षातर्फे अलिकडेच प्रभारींची यादी जाहीर केली आहे. पोटनिवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतरच उमेदवारांची निवड करण्यात येईल. या पोटनिवडणुकीत भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Next Article विमानतळावर 2.80 कोटींचे आयफोन जप्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.