काम योग्य प्रकारे हाताळा : जिल्हाधिकारी
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. रामदुर्ग, बैलहोंगल, सौंदत्ती या तालुक्मयांमध्ये हे प्रशिक्षण दिले जात आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी भेट देऊन कर्मचाऱयांनी योग्य प्रकारे मतदान काळात काम करावे, असे आवाहन केले.
निवडणुकीचे काम हे अत्यंत निःपक्षपातीपणे होणे गरजेचे आहे. निवडणूक काम अत्यंत पवित्र काम आहे. तेव्हा प्रत्येकाने काळजीपूर्वक या काळात काम करावे. कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
मतदान तसेच मतमोजणी काळात कोणतीही शंका असल्यास वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. कोणतीही शंका असेल तर तिचे निराकरण होणे गरजेचे आहे. सावधानता बाळगणे महत्त्वाचे असून कोणत्याही त्रुटीचा सामना करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
निवडणूक काळात कोविडचे नियम काटेकोरपणे पाळावेत. ते नियम पाळतच आपण सर्व काम करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या प्रशिक्षण अभियानाला नियुक्त केलेले पीआरओ, पीपीआरओ, साहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच तहसीलदार उपस्थित होते.