सांगली : प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग १६-अ मधील रिक्त जागेसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ २४.३९ टक्के मतदान झाले होते. एकूण ३४ केंद्रावर मतदान सुरू असून त्यापैकी काही केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी होती. दरम्यान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली.
मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. दिवंगत हारूण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त जागेवर ही पोट निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून तौफिक शिकलगार, भाजपचे अमोल गवळी, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे, अपक्ष सुरेश सावंत यांच्यासह सहा उमेदवार रिंगणात आहेत.