प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे कोरोना, लॉकडाऊन यांची धास्ती घेतल्याने जीवनावश्यक साहित्य जमा करण्यासाठी नागरिकांची रीघ लागली असताना दुसरीकडे आपल्या पोटासाठी मूर्ती विकण्यासाठीची पायपीट असे विदारक चित्र सोमवारी शहापूर परिसरात दिसून आले. लॉकडाऊन झाले तर मूर्ती विकण्याचा व्यवसाय बंद होईल या भावनेने पायात चप्पल नसतानाही मूर्ती विकण्यासाठीची विपेत्याची तळमळ बघ्यांच्या डोळय़ातून पाणी आणत होती.
सध्या शहापूर परिसरात घरोघरी जाऊन विविध महापुरुषांच्या मूर्ती विक्री केल्या जात आहेत. राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी पुढील 14 दिवस नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यानंतर मूर्ती विकण्यास परवानगी मिळेल की नाही या चिंतेने विपेते व्याकुळ झाले होते. भर उन्हात छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतर थोर पुरुषांच्या मूर्ती घरोघरी जाऊन ते विक्री करीत होते. बेळगावमध्ये शिवभक्तांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या मूर्ती मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्या जातात. यामुळे हे विपेते या मूर्ती विक्री करीत आहेत.