भरतेश, बाशीबन, चिटणीस संघालाही यश
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
फिनिक्स स्पोर्ट्स कौंन्सिल आयोजित दहावी फिनिक्स चषक 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून पोतदार इंटरनॅशनल, भरतेश सेंट्रल, एम. व्ही. एम., ज्ञान प्रबोधन, बाशीबन, जी. जी. चिटणीस संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रत्येकी 3 गुण मिळविले.
कनक मेमोरियल स्कूलच्या मैदानावर आयोजित 13 वर्षाखालील फिनिक्स चषक फुटबॉल स्पर्धेत दुसऱया दिवशी पहिल्या सामन्यात पोतदार इंटरनॅशनल संघाने केएलई इंटरनॅशनल संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात दहाव्या मिनिटाला पोतदारचा हुसेन जमादार याने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात 38 व्या मिनिटाला हुसेन जमादारने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱया सामन्यात भरतेश सेंट्रल स्कूलने लव्हडेल संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. भरतेश सेंट्रलच्या सोहम कालिंगने दुसऱया मिनिटाला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी भरतेशला विजयास कारणीभूत ठरली. तिसऱया सामन्यात एमव्हीएम संघाने केएलएस पब्लिक संघाचा 2-0 असा पराभव केला. 11 व्या मिनिटाला स्वप्निल कणबरकरच्या पासवर वरद देसाईने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 17 व्या मिनिटाला वरद देसाईच्या पासवर स्वप्निल कणबरकरने गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. या सामन्यात केएलएस पब्लिक स्कूल संघाला गोल करण्यात अपयश आले.
चौथ्या सामन्यात ज्ञान प्रबोधन संघाने मदनी संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात 6 व्या मिनिटाला परिक्षित कंग्राळकरने पहिला गोल केला. 8 व्या व 22 व्या मिनिटाला सुजल गोरलने सलग दोन गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात 36 व्या मिनिटाला परिक्षित कंग्राळकरने चौथा गोल तर 39 व्या मिनिटाला गंधर्व नाईक याने पाचवा गोल करून 5-0 अशी आघाडी मिळवून दिली.
पाचव्या सामन्यात बाशिमान संघाने ज्ञानमंदिर संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 29 व 31 व्या मिनिटाला बाशिबनच्या सौदने गुंडीने सलग 2 गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. सहाव्या सामन्यात जी. जी. चिटणीसने अमृता विद्यालय संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. 7 व्या मिनिटाला दर्शन मातंगीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
रविवारचे सामने 1) कनक मेमोरियल वि. पोतदार इंटरनॅशनल सकाळी 9 वा.
2) संत मीरा वि. लव्हडेल सकाळी 10 वा. 3) इस्लामिका वि. एमव्हीएम यांच्यात 11 वा. 4) फिनिक्स पब्लिक वि. मदनी यांच्या दु. 12 वा. 5) केएलएस इंग्लिश वि. बाशीबन यांच्यात दु. 1 वा. 6) सेंटपॉल्स वि. अमृता विद्यालय दु. 2 वा. 7) सेंट झ्sावियर्स वि. गुड शेफर्ड यांच्यात 3 वा. खेळविण्यात येणार आहे.