के.आर. शेट्टी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के.आर.शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के.आर.शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांतून पोतदार के.आर.शेट्टी संघाने साईराज वॉरियर्स संघाचा 34 धावांनी तर झेवर गॅलरी संघानी विश्रृत स्ट्रायकर्स संघाचा फ गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. वैभव कुरूबागी (के.आर.शेट्टी), मदन बेळगांवकर (विश्रृत स्ट्रायकर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात पोतदार के.आर.शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 142 धावा केल्या. वैभव कुरूबागीने 1 षटकार आणि एक चौकारांसह 45, अंगदराज हीतलमुनी यांनी दोन चौकारांसह 27, दर्शन पाटीलने 3 चौकारांसह 18 तर प्रणय शेट्टीने 13 धावा केल्या. साईराजतर्फे अनिकेत लोहारने 31 धावांत 2, नरेंद्र मांगोरेने 30 धावांत 2, कृष्णा बागडीने 32 धावांत 2 तर रवळू पाटीलने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल साईराज वॉरियर्स संघाचा डाव 16.5 षटकांत सर्वगडी बाद 108 धावांत आटोपला. त्यात कृष्णा बाडगीने 1 षटकार आणि एक चौकारांसह 22, शुभम गौंडाडकरने 15 धावा केल्या. पोतदारतर्फे रब्बानी दफेदारने 10 धावांत 3, वैभव कुरबागीने 13 धावांत 2, यासीर निहालने 36 धावांत 2 तर अंगदराज हितलमनीने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात विश्रृत स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकांत सर्वबाद 105 धावा केल्या. आकाश कटांबळेने 1 षटकार, 4 चौकारांसह 39 तर आदित्त्य कलपत्रीने 15 धावा केल्या. झेवर गॅलरीतर्फे माझीद मखानदारने 17 धावांत 3 तर रोहित पाटीलने 21 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल झेवर गॅलरी संघाने 19 षटकांत 8 बाद 106 धावांसह सामना जिंकला. नागेंद्र पाटीलने 1 षटकार, 3 चौकारांसह 29 तर चेतन पांगिरेने 1 षटकार, 4 चौकारांसह 23 धावा केल्या. विश्रृततर्फे मदन बेळगांवकरने 8 धावांत 4, यश ओझाने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मल्लेश चौगुले, सिद्दाप्पा कांबळे, फईम नाईकवाडी, संजय सातेरी, पुणीत शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर वैभव कुरूबागी, इम्पॅक्ट खेळाडू रब्बानी दफेदार, उत्कृष्ट झेल अमीत यादव, सर्वाधिक षटकार डॉम्निक फर्नांडिस यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई, प्रताप शेट्टी, वीरेंद्र शेट्टी, ऍड. प्रभाकर शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर मदन बेळगावकर, इम्पॅक्ट खेळाडू रोहित पाटील सर्वाधिक षटकार आकाश कटांबळे, उत्कृष्ट झेल आकाश पत्तार यांना चषक देवून गौरविण्यात आले.
गुरूवारचे सामने 1) के.आर. शेट्टी किग्ज वि. साई स्पोर्टस् सकाळी 9.30 वा., 2) मार्ग रायझींग स्टार वि. अर्जुन स्पोर्टस् हुबळी टायगर्स दुपारी 1.30 वाजता.