तरुण भारत ऑनलाइन टीम
अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन बऱ्याच दिवसानंतर लवकरच मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ऐश्वर्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटातील लूक शेअर केला आहे.
या चित्रपटात ती त्रिशा या राजकुमारीच्या भूमिकेत आहे. ऐश्वर्या या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. एकंदरीत हे पोस्टर पाहता हा रक भव्य चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. अनेक वर्षानंतर ऐश्वर्या मणिरत्नमसोबत काम करत आहे. याआधी तिने ‘रावण’ आणि ‘गुरू’ चित्रपटात त्यांच्यासोबत काम केले आहे. पोन्नियन सेलवन’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिला भाग ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.तसेच हा चित्रपट तेलगू ,तामिळ ,हिंदू ,मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.